KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

संशोधन

                         संशोधन  



अल्बर्ट आईनस्टाईन यांना महान शास्त्रज्ञ म्हणून सर्व जग ओळखते. विज्ञानाच्या प्रगतीसाठी त्यांनी आपले सारे जीवन समर्पित केले. संशोधनाच्या आड येणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा त्यांनी लोभ धरला नाही. इस्रायल सरकारचे विख्यात शास्त्रज्ञ डॉ. बेजमैन यांचे निधन झाले. त्यांच्या जागी दुसरे कोण नेमायचे. याचा विचार चालू असता त्या उच्च पदासाठी आइन्स्टाईनसारखे दुसरे कोणीही लायक नाही, असे सर्वांचे एकमत झाले. आइनस्टाईनना ते पद स्वीकारण्यासाठी शासनातर्फे पत्र पाठविण्यात आले. दुसरा कोणी असता तर त्याने लगेच होकार दिला असता; परंतु आइनस्टाईन यांचे व्यक्तिमत्त्व काहीसे वेगळ्या प्रकारचे होते. ते अत्यंत निःस्पृह व निलोंभी होते. अभ्यास हाच त्यांचा ध्यास होता. त्यांनी सरकारला विनम्रपणे पत्र लिहिले, “आपण जो माझा सन्मान करीत आहात, त्याबद्दल आभारी आहे; परंतु इतक्या मोठ्या पदावर काम करणे मला दोन कारणांमुळे शक्य नाही. एकतर मी त्यासाठी तेवढा योग्य नाही व दुसरे म्हणजे शासकीय तंत्र सांभाळून मला कार्य करता येणार नाही. मी वैज्ञानिक असून प्रयोगशाळेत संशोधन करूनच मला समाधान व शांती प्राप्त होते. कृपया माझा हा अहंकार आहे, असे न समजता खरोखरंच, प्रयोगशाळेच्या बाहेर मी रममाण होऊ शकणार नाही." अणुक्षेत्रात क्रांती करणाऱ्या त्या धोर शास्त्रज्ञाने सर्वोच्च पदावर बसण्याचा लोभ झिडकारून संशोधन साधनाच चालू ठेवली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking