KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

परिश्रम

                            परिश्रम 



        परिश्रम जीवनाचे अमृत आहे. विद्या, यश, संपत्ती, कीर्ती सर्व परिश्रमानेच प्राप्त होते. एकदा सम्राट हदरियन आपल्या सेनेसह स्वारीवर चालला होता. वाटेत त्याने एका वृद्ध माणसाला अंजिराचे रोपटे लावत असताना बघितले. राजाने त्याला विचारले "म्हातारपणी कशाला एवढे श्रम करता ? तुम्हाला या वृक्षाची आहेत आपणास हजारो च फळे चाखायला मिळू शकतील का?" त्या वृद्धाने उत्तर दिले. "राजन ! मी जिवंत राहिलो तर मी स्वतः या वृक्षाची फळे खाऊ शकेन. मी मेलो तर माझे मुलगे, नातू अंजीर खातील." तीन वर्षांनंतर राजा पुन्हा एकदा त्याच रस्त्याने जात असता त्या वृद्धाने टोपली भरून अंजीर राजापुढे ठेवले व म्हणाला, “तीन वर्षांपूर्वी आपण म्हणाला होता की, या वयात मी एवढे परिश्रम घेता कामा नये. श्रमाची फळे किती मधुर असतात बघा !" राजाने आपल्या सेवकांना ती टोपली खाली करून घेण्यास व रिकामी टोपली सुवर्णमुद्रांनी भरून देण्यास सांगितले. वृद्ध जेव्हा सोन्याची मोहरांची टोपली घेऊन घरी आला तेव्हा त्याच्या शेजान्याला हे वर्तमान कळले. दुसऱ्या दिवशी शेजारणीने नवन्याला अंजिराची करंडी घेऊन राजाकडे जाण्यास सांगितले. राजाला सर्व प्रकार लक्षात आला. त्या माणसास धडा शिकविण्यासाठी राजाने ते अंजीर त्याला फेकून मारण्यास सुरुवात केली. घाबरून तो पळत सुटला व कसाबसा घरी आला. घरी आल्यावर बायकोने विचारले, "हे काय ! खाली हात आलात?" नवरा म्हणाला, “तुझे भाग्य थोर म्हणून मी वाचलो. अंजिराऐवजी नारळ असते तर त्यांच्या फेकण्यामुळे मी गतप्राणच झालो असतो! राजा परिश्रमाला बक्षीस देतो. अंजिराला नाही." परिश्रमांमुळेच मानवाचा महामानव होतो !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking