समभाव
एक सैनिक महत्त्वाच्या कामासाठी घोड्याला जोरजोराने पळवत नेपोलियनकडे आला. सेनापतीचा एक अतिशय महत्त्वाचा निरोप नेपोलियनला द्यायचा होता. निरोप तातडीचा असल्याने त्याने घोड्याला खूप वेगाने पळविले होते. त्या श्रमामुळे घोडा गतप्राण झाला. नेपोलियनने सेनापतीच्या पत्राचे उत्तर सैनिकाला लगेच दिले व म्हणाला, “तुझा घोडा मरण पावला आहे, तेव्हा तू माझा घोडा घेऊन ताबडतोब जा." सैनिक त्यामुळे संकोचून म्हणाला, “माझ्यासारख्या सामान्य शिपायाने आपल्या घोड्यावर स्वार होणे उचित नाही, मी पायीच जाईन.” असता; परंतु आ होते. ते अत्यंत होता. त्यांनी स सन्मान करीत पदावर काम त्यासाठी तेवढ मला कार्य क संशोधन करू अहंकार आहे रममाण होऊ शास्रज्ञाने साधनाच चा नेपोलियन उद्गारला, "नाही! नाही! असे होणार नाही! जगात अशी कोणती वस्तू आहे, की, जिच्यावर तुझा अधिकार नाही ? देशासाठी आपले प्राण समर्पण करण्यास तयार असलेल्या "तू अजून सैनिकापेक्षा या जगात दुसरी कोणती मौल्यवान गोष्ट आहे? माझा आहेत." घोडा मनात काहीही न आणता घे व सेनापतीला संदेश पोहोचव.” सैनिक अजूनही त्या श्रेष्ठ घोड्यवर स्वार होण्यास कचरत होता. नेपोलियन परत एकदा त्याला म्हणाला, “या जगात अशी कोणतीही असाधारण वस्तू नाही की, जिचा साधारण मनुष्य उपयोग करू शकत नाही. सर्व जण सारखेच आहेत. प्रत्येकाचे काम आपापल्या परीने श्रेष्ठ आहे.' सैनिकाने नेपोलियनचा घोडा घेतला व सेनापतीचे उत्तर त्याला देण्यासाठी लगेच तो निघाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.