मृदुता
प्रसिद्ध चिनी तत्त्वज्ञ कन्फ्यूशिअस म्हातारा झाला. त्याचे सर्व दात पडून गेले. एके दिवशी त्याने शिष्यांना आपले तोंड उघडून आत दात आहेत का, असा प्रश्न विचारला. शिष्यांनी उत्तर दिले, नाही'. त्यांनी शिष्य यांना परत तोंडा मधे पहावयास सांगितले आणि प्रश्न विचारला की, 'तोंडामधे जीभ आहे काय?' सर्वांनी मिळुन'होय' उत्तर दिले. 'जीभ आहे परंतु दात मात्र पडले आहेत,याविषयी कारण कोणी सांगू शकेल काय?' त्याने शिष्यांना विचारले. कोणीच शिष्य उत्तर देऊ शकला नाही. तेव्हा कन्फ्यूशिअस म्हणाला, 'जीभ तिच्या मृदुतेमुळे टिकून आहे; दात हे त्यांचे कठोरतेमुळे पडले.' ऋजुता किंवा मृदू स्वभाव जीवन सुंदर बनवतो, तर कठोरता, उद्धटपणा जीवनाला कुरूप बनवतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.