KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

उदारता

                                      उदारता



        शेठ धनीराम नावाप्रमाणेच श्रीमंत होते. नम्रता, साधेपणा, उदारता, धार्मिकता अशा गुणसंपत्तीनेही त्यांचे जीवन समृद्ध होते. एकदा त्यांना एका विधवेची करुण कहाणी कळली. तिच्या घरात मिळवते कोणीच नव्हते. शेठ धनीरामने आपल्या सेवकाबरोबर तिच्या घरी खाण्यासाठी लाडू पाठविले. एका लाडूत त्यांनी एक सुवर्णमुद्रा टाकून ठेवलेली होती. मुलगा शाळेतून आल्यावर खाण्यासाठी त्याने तो लाडू फोडला; तर आत सुवर्णाची मुद्रा. त्याने आपल्या आईला ती दाखविली. आईने ती शेठधनीराम यांना नेऊन देण्याकरिता मुलांना बोलले. त्याप्रमाणे मुलगा त्यांच्या घरी गेला व ती सुवर्णमुद्रा परत केली. शेठजी त्या मुला बरोबर त्यांच्या घरी गेले आणि त्यांच्या आईला बोलले, “माई, मी मुद्दाम ती सुवर्णमुद्रा एका लाडूत टाकली होती. घरात अठरा विश्वे दारिद्र्य असतानाही तुझा प्रामाणिकपणा पाहून मी थक्क झालो आहे. या मुलाचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च मी करीन. तू अजिबात काळजी करू नकोस." शेठजींची ती अद्भुत उदारता व परोपकारी वृत्ती पाहून त्या मातेच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे अश्रू वाहू लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking