KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

अस्मितादर्शन

                                           अस्मितादर्शन 



      श्रीमती सरोजिनी नायडू भारताच्या बुलबुल म्हणून ओळखल्या जात. 

इंग्रजी भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. एक वेळ त्यांनी त्यांच्या कविता महान पाश्चिमात्य समीक्षक गो यांना दाखविल्या व त्यांचा अभिप्राय विचारला गेला. ते म्हणाले, "माझ्या मते, या कवितांमध्ये आपल्या प्रतिभेचे दर्शन पाहिजे तसे घडत नाही.” हा अभिप्राय ऐकून सरोजिनी नायडू थोड्या खट्ट झाल्या. गोसे यांच्या ते लक्षात आले. तेव्हा ते म्हणाले, "माझ्या टीकेचा वरवरंचा अर्थ लक्षात न घेता त्यातील ध्वनितार्थ लक्षात घ्या. आपल्यासारख्या प्रतिभावान कवयित्रीकडून माझी वेगळी अपेक्षा आहे. इंग्रजी भाषा व संस्कृती यांचा आपला सखोल अभ्यास आहे; परंतु आम्ही युरोपीय टीकाकार तुमच्या काव्यात भारतीय संस्कृतीचे व अस्मितेचे दर्शन पाहण्यास उत्सुक आहोत.” सरोजिनींना ती गोष्ट पटली.त्यांच्या मनात, लेखनात त्यांनी ती उतरवली व त्यांच्या काव्यप्रवाहाने वेगळे वळण घेतले गेले. साहित्य हा लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा व समाजाचा आरसा असतो. त्यातून लेखकाच्या अस्मितेचे व संस्कृतीचे दर्शन घडले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking