व्यसनमुक्ती : काळाची गरज
माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, विकसनशील भारतांसमोर अनेक प्रश्न समस्या बनून उभे आहेत. त्यातीलच एक चिंतेचा प्रश्न म्हणजे भारतात वाढत चाललेली व्यसनाधीनता. महासत्ता बनण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या भारत देशासाठी व्यसनाधीनता ही ऐरणीवरची समस्या आहे.
भारत हा युवकांचा देश आहे असे म्हटले जाते पण हा युवक जर व्यसनाधीन असेल तर मग आपल्या देशाचे भविष्यही दिशाहीन असेल की काय? अशी भीती मनात निर्माण होत आहे आणि म्हणूनच व्यसनमुक्ती ही काळाची गरज आहे. व्यसन ही एक विकृती आहे. ही घातक विकृती शारीरिक प्रकृतीबरोबरच पवित्र संस्कृतीही पोखरत आहे.
बालवयापासून वृद्धापर्यंत, जीवताच्या या सर्वच अवस्थांवर व्यसनांनी ताबा मिळवलेला दिसतो. धूम्रपान करणारे घरातील पालक आपल्या मुलाला दुकानातून सिगारेट आणायला लावतात. एक दिवस हेच पालक मुलाला सिगारेट पटवून आणायला लावतात. सुरुवातीला त्याच्याकडून ती सिगारेट पेटवून आणताना विझली जाते. नंतर त्याच्या लक्षात येते की झुरका माला की सिगारेट पेटती राहते. आणि मग केवळ सिगारेट विझू नये म्हणून हा मुलगा एक झरका घेतो आणि हा एकच झुरका त्याच्या आयुष्यात अंधार निर्माण करतो अशा प्रकार घरातील वातावरणही व्यसनाधीनतेला कारणीभूत ठरते.
शिक्षणासाठी बाहेर गेलेले विद्यार्थी कुसंगतीमुळे व्यसनांच्या वाईट मार्गावर जातात. यशी नशा व अपयशाची निराशा यातून तरुणांच्या अनेक पाठ होतात आणि व्यसनांचाही संसर्गजन्य रोग फैलावतच राहतो.
त्यातच राजकीय पुढारी निवडणुकांच्यावेळी याला अधिकच खतपाणी घालतात अशा अनेक कारणांमुळे विद्यार्थी तरुण व प्रौढसुद्धा व्यसनांच्या जाळ्यात अडकला जात आहे. व्यसनाचे अनेक दुष्परिणाम समाजामध्ये पाहायला मिळतात. व्यसनामुळे युवकाची तेजस्विता नष्ट होत आहे. तत्परता संथ होत आहे व तपस्विता भंग होत आहे.
व्यसनांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. अनेकांना दारिद्र्याने पिडले आहे. दारू विकणाऱ्यांच्या घरांचा मात्र लिलाव होतो आहे. अनेक रोगांना बळी पडून व्यसनाधीन माणसांना अकाली मृत्यू येत आहे. व्यसनांपासून दूर असलेल्यांना अधिक दूर ठेवणे गरजेचे आहे. कारण व्यसन लावून न घेणे हा व्यसनमुक्तीचा पहिला मार्ग आहे. कारण व्यसन लावून न घेणे हा व्यसनमुक्तीचा पहिला मार्ग आहे. त्यासाठी पालक व पाल्य यांच्यात सुसंवाद असला पाहिजे. 'सुसंगती सदा घडो' हे युवकांचे ब्रीद असले पाहिजे.
पालकांनी मुलांसमोर व्यसनांचे प्रदर्शन न केलेले बरे. यश मिळाले असता हुरळून जाऊ नये व अपयश आल्यास निराश होऊ नये, हे जीवनसूत्र विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले पाहिजे. व्यसनांच्या आहारी गेलेल्यांना व्यसनापासून परावृत्त करणे आवश्यक आहे.
त्यासाठी मार्गदर्शन, समुपदेशन चांगले छंद, सुसंगत यांसारख्या मार्गाचा अवलंब करता येईल. लेखक अनिल अवचट यांच्या 'मुक्तांगण'सारख्या संस्थाही संस्थापक पातळीवर यासाठी प्रयत्न करीत आहेत. प्रसार माध्यमांनीही प्रबोधनाची भूमिका बजावणे जरूरीचे आहे. अनेक सेवाभावी ट्रस्ट महिला मंडळे यांमार्फत व्यसनमुक्ती अभियाने राबविली जातात. समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींनी यासाठी सहकार्य केल्यास आपला समाज व विशेष करून युवापिढी व्यसनमुक्त होईल आणि मग तरुणांच्या या तरुण देशाचे भवितव्य देखील चिरतरुण असेल.
जय हिंद!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.