KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 28(शिक्षण केवळ श्रीमंतांसाठी?)


                                  शिक्षण केवळ श्रीमंतांसाठी? 

       माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, शिक्षण म्हणजे शिक क्षण क्षण. आपण आयुष्यभर प्रत्येक क्षणी काही ना काही शिकत असतो. नवनवीन गोष्टी समजून घेत असतो. अगदी जन्मलेले बाळ वाढीबरोबर नवनवीन गोष्टी शिकत असतं. 
       आईला ओळखणां, स्पर्श, आवाज ओळखणं, रंगांची, पक्ष्यांची, झाडांची ओळख करून घेणं, मोठी माणसही नित्य काही ना काही शिकत असतात. हे झालं औपचारिक शिक्षण. यात आपण अनुभवातून शिकतो. या शिक्षणाला वेळ लागतो आणि प्रत्येक अनुभव घेण्यासारखा असतो असं नाही. शिक्षण केवळ श्रीमंतांसाठी या आजच्या विषयात अनौपचारिक शिक्षण येत नाही. औपचारिक शिक्षण म्हणजे शालेय, महाविद्यालयीन शिक्षण, उच्च शिक्षण केवळ श्रीमंतांसाठीच आहे का? असा भाषणाचा रोख आहे. पुराती काळापासून शिक्षण केवळ श्रीमंतांनाच परवडणारी बाब राहत आलेली आहे. राजपुत्रांना शिक्षण देण्यासाठी राजदरबारी गुरू असत. गुरुकुलात शिक्षणाला जाणाराही विशिष्य वर्गच असे. 
     एकलव्यासारख्या आदिवासी मुलाला गुरुद्रोणाचार्यांनी शिक्षण नाकारलं. एवढंच नाही, तर त्या भाबड्या विद्यार्थ्यांना गुरूंच्या पुतळ्यापासून प्रेरणा घेऊन, विद्या आत्मसात केली. यात त्याची शिक्षणाविषयीची तळमळ दिसून येते; परंतु अशा प्रत्यक्ष विद्यार्थी नसलेल्या भाबड्या जीवाकडून दक्षिशर म्हणून अंगठा घेण्यात द्रोणाचार्यांचा धूर्तपणा, कोतेपणा, दुष्टपणाच दिसून येतो. आजही परिस्थिती वेगळी नाही. तळागाळातील बालकांसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत; परंतु या योजना खेड्यापाड्यांतून, आदिवासी भागांतून गरजू विद्यार्थ्यापर्यंत कितपन पोहोचतात? गेल्या चाळीस वर्षात किती आदिवासी मुलं याचा लाभ घेत आहेत? खेड्यापाड्यांतून गुरांमागे, शेतावर राबणाऱ्या मुलांची संख्या निश्चित कमी नाही.        शहरांतून, हॉटेलमध्ये, गॅरेजमध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची संख्या कमी नाही. ही मुलं मोफत शिक्षणाचा लाभ का घेऊ शकत नाहीत? शाळेत जाण्यासाठी लागणाऱ्या टाय, बूट, स्वेटर अशा वस्तू सोडाच; पण साधा रोज लागणारा शर्ट अंगावर धड नसतो. ही मुलं ज्या वस्त्यांतून राहतात, त्या वस्तीत त्यांचं एवढंस नाल्याकाठी झोपडं असतं. 
       पावसाळ्यात या झोपडीखालून पाणी जातं तर उन्हाळ्यात या झोपडीत ऊन उतरतं. झोपडीबाहेरचा एक दगड म्हणजे न्हाणी. झोपडीत धड बसता येत नाही, तर उभं राहण्याची बातच सोडा. बाहेर खाटेवर लक्तरात कुडकुडणारी कृश म्हातारी शरीरं; अवतीभोवती नागडीउघडी लहान पोरं, कसं तरी अब्रू झाकून जगणाण्या तरुण बायका, पोरी... अशा झोपड्यांपर्यंत शिक्षण घेऊच शकत नाही. यातूनही जी थोडीफार बरी मुलं शिक्षण घेतात, ती सरकारनं खंबीरपटे सवलती दिल्या म्हणून. सवलती घेणाऱ्या मुलांच्या गुणवत्तेबद्दल कांगावा होतो. 
     उच्च गुणवत्ताप्राप्त ओपन मेरिटज्या किती मुलांची आई पहाटे उठून रस्ते झाडते. किती मुलांची आई बंगल्याबंगल्यामधून धुणेभांडे करून, फरशी धूत फिरते? मातीकामाला जाते? किती मुलांचे वडील म्युनिसिपालिटीमध्ये गटारे साफ करायला आहेत ? किती मुलांचे वडील शेतमजूर म्हणून उन्हातान्हात राबताहेत? अशा कुटुंबातून येणाऱ्या मुलांनी उच्च गुणवत्ता प्राप्त केली नाही, तरच नवल आहे. 
      खाजगी शाळा-कॉलेजातून चांगलं शिक्षण दिलं जातं. तिथं भरपूर पैसेही ओतावे लागतात. इंजिनीअरिंग, मेडिकल कॉलेजच्या अभ्यासक्रमातून व्यवसाय मिळण्याची १०० टक्के गॅरंटी असते. ओतलेला पैसा हजारो पटींनी वसून गेतो, समाजातले ५ टक्के श्रीमेत लोक ५० टक्क जागा अडवितात. हे चित्र आपल्या आर्थिक विषमतेचंप्रतीक आहे. देश स्वतंत्र होऊन ४६ वर्षे झाली. 
        लोकांना कितपत आर्थिक स्वातंत्र्य मिळालं? श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत तर गरीब अधिकाधिक गरीब झाले. असं म्हणतात, की कष्टाचं फळ गोड असतं; पण इथं तर कष्टाचे फळ कडूच आहे. शिक्षणातून आर्थिक स्वातंत्र्या मिळवून देणारे शिक्षण देशातल्या ५ टक्के श्रीमंतांसाठी आहे. असे श्रीमंत ५० टक्के जागा अडवतात. उरलेल्या जागांपैकी ५ टक्के जागा जे खरोखरच गरीब, उपेक्षित; तरीही असामान्या बुद्धिचे आहेत अशांसाठी आहेत. ते हे मोठ्या कष्टाने मिळवितात. उरलेल्या ४५ टक्के जागा खाऊनपिऊन सुखी असलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबासाठी आहेत.
     त्या त्यांना सहज मिळतात. ज्या शिक्षणातून कुठलेही आर्थिक स्वातंत्र्य मिळणार नाही अशा शिक्षणाच्या शाखा सर्वांसाठी खुल्या आहेत. त्या फक्त बेकारांची फौज निर्माण करू शकतात. म्हणून म्हणतो- आजचं शिक्षण फक्त श्रीमंतंसाठीच आहे. 
जय हिंद!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking