KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 17 (15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन)

 १५ ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन 

            माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला १५ ऑगस्टबद्दल दोन शब्द बोलणार आहे, तरी तुम्हीं शांत चित्ताने ऐकावे... 

           आज १५ ऑगस्ट आहे. १५ ऑगस्ट १९४७ हा भारताच्या स्वातंत्र्याचा सुवर्णदिन मानला जातो. देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून, बंधनातून मुक्त झाला. अखंड भारताचा राष्ट्रीय सण, उत्सव, उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस. 

            या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अशा अनेकांच्या शौर्यातून, बलिदानातून मिळालेल्या या स्वातंत्र्याचे या आधुनिक युगाच्या उंबरठ्यावर आपल्याकडून पतन व्हायला लागलंय. हे कुठंतरी थांबायला हवं असं मला वाटतंय. 

           आपल्या समाजात, देशात सुरक्षितता राहिली नाही. जातीचे भांडवल केले जाते किंवा श्रीमंत गट किंवा सावकाराचे हात-पाय पकडावा लागतो. मग आहोत का आपण स्वतंत्र? 

            प्रत्येक निवडणुकीनंतर महागाई सुमारे दहा टक्के वाढते. कष्टाचा पैसा जगण्यापुढे शून्यवत ठरावा असा गैरमार्गी पैसा उघडपणे व्यवहाराच्या क्षेत्रात फिरत राहतो. हे चलनवलन आपल्या मागे अनीतीची एक लाट घेऊन येते ती थोपवण्यासाठी एखादा सत्याग्रही प्राण पणाला लावतो पण हा खारीचा वाटा आज रामायण घडवू शकत नाही. रामच जागेवर नसेल, तर खारीला बळ येणार कुठून?

            राष्ट्राच्या जीवनात जेव्हा सुवर्णकाळ आला तेव्हा एक गोष्ट प्रत्ययास येत होती. मनुष्य बळाचे व्यवस्थापन उत्तम पद्धतीने घडत होते. शिवछत्रपतींनी है बळ जोखले, जाणले, जपले व समाज जीवनात सुखाचे पर्व निर्माण केले.

             विद्यमान भारतातल्या लोकशाहीत लोकशक्तीचा वरपांगी उद्घोष केला जातो पण तिचे भरण-पोषण केले जात नाही. माणसे अक्षरश: हवालदिल झाली आहेत. कुठल्याही प्रकारची सुरक्षितता दिसत नाही. भरदिवसा सर्वांसमक्ष अपराध घडतो आहेत. अपराधी मोकाट फिरत आहेत. सर्वसामान्य मात्र भयावह स्थितीत जीवन जगत आहेत. असे स्वातंत्र्य योग्य राहील का? स्वप्नातला भारत घडवायचा असेल तर युवकांनी, असीम त्यागाची राष्ट्रभावनेची कदर केली पाहिजे तर आणि तरच आपला भारत आणि भारतातील प्रत्येकजण स्वतंत्र होईल, असे मला वाटते. 

जय हिंद!


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking