KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

भाषणे शाळेतील मुलांसाठी भाग - 16 (पंडित जवाहरलाल नेहरु)

पंडित जवाहरलाल नेहरू 
              माननीय अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन, वर्गमित्र आणि माझ्या बालमित्रांनो, जगाच्या पाठीवर फारच थोड्या नेत्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान लाभला. त्यातीलच एक महान नेतृत्व म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होय. 
            पंडित नेहरूचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांन लहान मुले फार आवडत. मुले त्यांना आदराने 'चाचा नेहरू' म्हणत. म्हणूनच त्यांचा जन्मदिन आज भारतभर 'बालदिन म्हणून साजरा केला जातो. बालपण अतिशय अलिशान श्रीमंतीत व शिक्षण पाश्चात्य वातावरणात होऊनही त्यांच्या निष्ठा मात्र सदैव भारतभूमीशी बांधील राहिल्या. गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर विलक्षण प्रभाव होता. म्हणूनच त्यांनी गांधीजींचे नेतृत्व त्यांनी मान्य केले होते. 
           देशाच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी केलेल्या सर्व चळवळींमध्ये नेहरू सक्रीय होते. उत्तर प्रदेशातील किसान सभेचे अध्यक्ष असताना ते ग्रामीण भागात फिरले. सामान्य माणसांमध्ये सामान्य बनून राहिले. गरिबांच्या व्यथा त्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहिल्या आणि देशाचे दारिद्र्य दूर करून जनतेचा विकास करणे हेच आपले परम कर्तव्य मानले. 
            १९४७ साली देशाच्या हाती असलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर करण्यासाठी भारताचा हा पहिला पंतप्रधान अविरतपणे प्रयत्न करीत राहिला तब्बल सतरा वर्षे पंतप्रधान म्हणून भारताच्या पुनर्निर्माणाचा ध्यास त्यांनी घेतला. देशाचे दारिद्र्य दूर करून जलद आर्थिक विकास साधण्यासाठी नियोजनाचा नवा मूलमंत्र त्यांनी देशाला दिला. पंचवार्षिक योजना ही त्यांचीच देणगी आहे
      औद्योगिक, वैज्ञानिक व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचे बीजारोपण भारतभूमीवर करण्याचे महान कार्य नेहरूंनी केले. राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहून देशामध्ये धर्मनिरपेक्ष शासन प्रस्थापित व्हावे असा आग्रह नेहरूंनी सुरुवातीपासूनच धरला होता. एकूणच पारतंत्र्यातून मुक्त झाल्यानंतर भारताने फिनिक्स पक्षाप्रमाणे जी उंच भरारी घेतली त्यामागे पंडित नेहरूंचा महत्त्वाचा वाटा होता. 
         स्वतंत्र भारताची उभारणी करत असतानाच जगातील इतर राष्ट्रांनाही गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी शांतता, सांमजस्य, विचार-विनिमय या मार्गाचा अवलंब केला. नेहरूंनी संपूर्ण जगाला शांतीचा संदेश दिला.
               मानवाची प्रतिष्ठा राखली जाऊन  प्रत्येकजण भयमुक्त व स्वयंपूर्ण झाला पाहिजे म्हणून त्यांनी समाजवादाचाही पुरस्कार केला. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवर निर्माण झालेला असंतोष मिटविण्यासाठी त्यांनी अनेक वर्ष प्रयत्न सुरू केले. 
          संपूर्ण जगाला त्यांनी शांततेचा संदेश दिला. 'पंचशील त्त्वांसारखी' मौल्यवान देणगी नेहरुंनी जगाला बहाल केली म्हणूनच जागतिक शांतिदूत म्हणून संपूर्ण जग त्यांना ओळखत होते. 
         जय हिंद!


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking