उपराष्ट्रपती Vice President
उपराष्ट्रपती हा हंगामी राष्ट्रपती म्हणून जास्तीत जास्त ६ महिने पदावर राहू शकतो.
उपराष्ट्रपतींसाठी घटनेच्या कलम ६३ ते ७० ची तरतूद केली आहे. उपराष्ट्रपतीची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांचे (निर्वाचित) सदस्य करतात.
उपराष्ट्रपती पदासाठी त्या व्यक्तीने वयाची ३५ वर्ष पूर्ण केलेली असावीत. तसेच तो राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा.
उपराष्ट्रपती गुप्ततेची शपथ राष्ट्रपतींसमोर घेतो.
उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध सभापती असतो. कलम ६४ उपराष्ट्रपती आपला राजीनामा स्वहस्ताक्षरात राष्ट्रपतीस सादर करतो. उपराष्ट्रपतींचे वेतन - १, २५०००/- रू.
उपराष्ट्रपतीच्या पदच्युतीसाठी १४ दिवसाच्या पूर्वसुचनेने त्यांच्या पदच्युतीचा ठराव प्रथम राज्यसभेत चर्चेला जातो.
राज्यसभेच्या मतदानात उपराष्ट्रपती भाग घेऊ शकत नाही परंतु निर्णायक मत देतो.
उपराष्ट्रपतीस मिळणारा पगार हा त्यास राज्यसभेचा सभापती या नात्याने मिळतो.म्हणजेच उपराष्ट्रपतीला स्वतंत्र पगार नाही.
उपराष्ट्रपतीचा कार्यकाल ५ वर्ष असतो.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकी संदर्भात वाद निर्माण झाल्यास त्यावर निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीस आहे. कलम -७१
उपराष्ट्रपतीस निवडणूक लढविण्यासाठी अनामत रक्कम २५,०००/- भरावी लागते.
निवडणूक लढविण्यासाठी अनुमोदन २० राज्यसभा व २० लोकसभा खासदारांचा पाठिंबा लागतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.