९२. इंधनाचे केंलरीमूल्य व प्रज्वलनांक हे दोन वैशिष्टपूर्ण गुणचर्म आहेत.
९३. हायड्रोजनचे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे, हायड्रोकार्बनपैकी निथनसे कॅलरीमूल्य सर्वात जास्त आहे.
९४. लाकूड है का्बीहायडरेटचे जटील संयुग आहे.
९५. एल.पी.जी. मध्ये व्युटेन आणि आयसोग्युटेन हे दोन्ही द्रवरुप स्वरुपात असतात,
९६. कार्य करण्यासाठी साठविलेली क्षमता म्हणजे ऊर्जा होय.
९७. एखादी वस्तू तिच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा संरुपणामुळे कार्य करु शकते. तेव्हा तिच्यामध्ये स्थितीज ऊर्जा आहे असे म्हटले जाते
९८. गुरुत्व स्थितीज ऊर्जा आणि प्रत्यास्थी स्थितीज ऊर्जा ही यांत्रिक ऊर्जेची दोन रुपे आहेत.
९९. एखाद्या चल वस्तूला तिच्या गतीमुळे प्राप्त होणारी ऊर्जा म्हणजेच गतीज़ ऊर्जा होय
१०१. SI पद्धतीत ऊर्जेचे एकक न्यूटन मीटर आहे. याला ज्यूल असे म्हटले जाते.
१०२. CGS पद्धतीत डाईन सेमी म्हणजेच अर्ग हे एकक वापरतात.
१०४. फटाक्यामध्ये रासायनिक ऊर्जा साठविलेली असते.
१०५. उर्जा अक्षय्यतेचा नियम सांगतो की, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा नष्टही करता येत नाही. केवळ तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रुपांतर करता येते.
१०६. कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती असुन एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती आहे.
१०७. SI प्रणालीत शक्तीचे एकक वॅट असते.
१०८. १ वॅट = १ ज्यूल/से = 1 N - m/s तसेच 1 HP = 746 वॅट
१०९. माध्यमातून प्रक्षोभाचा जो आकृतीबंध प्रवास घडतो त्या आकृतीबंधास 'तरंग' असे म्हणतात.
११०. यांत्रिक तरंग मधे दोन प्रकार असतात.अनुतरंग (Iongitudinal wave)व अवतरंग (transvere wave)
१११. ध्वनीचा कोरड्या हवेतील वेग ०°से तापमानाला ३३२ मी/से. आहे.
११२. ज्या ध्वनी तरंगाधी वारंवारता २० पेक्षा कमी किंवा २०,००० Hz पॅक्षा जास्त असते असे ध्वनी माणसाला ऐकू येत नाहीत. त्याला अवश्राव्य ध्वनी म्हणतात,
११४. ध्यनीलहरींचे परावर्तन होऊन 1/10 मूळ आवाज पुन्हा ऐकू येतो. हाच प्रतिध्वनी होय.
११५. प्रतिष्वनी ऐकू येण्यासाठी किमान १७ मी. अंतर असणे आवश्यक आहे.
११६. वटवाधुळ उच्च वारंवारतेचा ध्वनी निर्माण करतात. अशा ध्वनीला श्रव्यातीत ध्वनी म्हणतात.
११७. प्रतिध्वनीचे तत्व SONAR पद्धतीत वापरले जाते.उदा.
११६. SONAR - Sound Navigation And Ranging System
११९. पाण्यामध्ये ध्वंनीचा वेग १४१०m/s आहे तर समुद्राच्या पाण्यात हांच वेग १५५०m/s आहे. लोखंडामध्ये ध्वनीचा वेग सुमारे ५१००m/s आहे.
१२०. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक डेसिबल (decibel) असुन लघुरुपात डेसिबल हे dB असे लिहीतात.
१२१. नकोसा वाटणारा ध्वणी कुरव आहे.
१२२. पाण्याचे तापमान हे ४°से पेक्षा कमी झाल्यानंतर वैशिष्टपूर्ण अपवादात्मक आचरण दाखवित असते.
१२३. ४°से. या तापमानास पाण्याचे आकारमान न्यूनतम होते आणि ४°से. पुढे गेल्यास पाण्याचे आकारमानात वाढ होते.अशा रितीने पाण्याचे ०°से ते ४°से. या तापमाना दरम्यान होणाऱ्या आचरणास पाण्याचे असंगत आचरण असे म्हणतात.
१२४. बफखालील पाण्याचे तापमान ४°से. च राहते.
१२५. ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास दवबिंदू तापमान म्हणतात
१२६. ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफे चे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्द्रता असे म्हणतात.
१२७. दवबिंदू तापमानास सापेक्ष आद्रता १००% असते.
१२८.सापेक्ष आर्द्रता ६०% पेक्षा जास्त असेल तेव्हा हवा दमट असल्याचे जाणवते.
१३०. एकक वस्तुमानाच्या पदार्थचि तापमान १'से. ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता होय,
१३१. एका माध्यमातून दुसन्या पारदर्शक माध्यमात तिरकस जाताना, प्रकाश किरणांच्या प्रसारणाच्या दिशेत बदल होतो यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात.
१३२. कोणत्याही पदार्थ भाध्यमात प्रकाशाचे आपल्या धटक रंगात पृथकारण होण्याच्या प्रक्रियेस प्रकाशाचे अपस्करण असे म्हणतात.
१३३. प्रिझम मधून अभिक्रमण करताना प्रकाश किरणांचे झालेले विचलन हे प्रिझमच्या पदार्थाच्या अपवर्तनांकावर अवलंबून होते. जांभळ्या रंगाचा प्रकाशकिरण सर्वात जास्त विचलीत होतो तर तांबड्या रंगाचा प्रकाश किरण सर्वात करमी विचलीत होतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.