KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

महानगरपालिका आयुक्त Municipal commissioner


 महानगरपालिका आयुक्त : Municipal commissioner

हा महानगरपालिकेच्या प्रशासन यंत्रणेचा प्रमुख असतो. या पदावर आयएएस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ज्येष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक सरकारकडून केली जाते. महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची तो अंमलबजावणी करतो. 

महानगरपालिकेच्या बैठकीस तो उपस्थित राहतो, परंतु निर्णय घेताना मतदान घेतल्यास त्याला मत देण्याचा अधिकार नसतो. कोणत्याही महत्त्वाच्या नागरी प्रश्नांबाबत तो सभागृहासमोर निवेदन करतो. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना तो उत्तरे देतो. 

महानगरपालिकेच्या प्रशासनाबाबतचा वार्षिक अहवाल तो सादर करतो, तो वार्षिक अर्थसंकल्प तयार करतो आणि स्थायी समितीकडे तपासणीसाठी पाठवितो. आयुक्ताच्या मदतीला उपायुक्त, नगर अभियंता, आरोग्याधिकारी, शिक्षणाधिकारी हे प्रमुख अधिकारी व इतर मोठा अधिकारी वर्ग आणि कर्मचारी वर्ग असतो. 

कार्ये : 

१) महानगरपालिकेचा प्रशासकीय अधिकारी. 

२) कार्यालय प्रमुख. 

३) पदसिद्ध सेक्रेटरी 

४) सल्ला व मार्गदर्शन देतो. 

५) महानगरपालिका व शासनातील दुवा. 

महापालिके च्या आयुक्ताने दरवर्षी ३१ जुलैपूर्वी पर्यावरण परिस्थितीविषयक अहवाल महापालिकेसमोर ठेवणे बंधनकारक आहे. महापालिका क्षेत्रासाठी वेगळी जिल्हा नियोजन आणि विकास समिती नेमतात. त्यातील २/३ निवडून आलेले असतात, तर १/३ नियुक्त असतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking