KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

सामान्य ज्ञान भाग - 1




MPSC राज्य सेवा परिक्षेमधील PSI/ASO/STI साठी उपयुक्त ठरु शकणारे परिक्षेच्या दृष्टीने मांडणी केलेले उपयुक्त 

सामान्य विज्ञान इयत्ता पाचवीमधील अति महत्वाचे उपयुक्त मुद्दे

1. शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिद्रीये म्हणतात.

2.  मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रीयांची उदाहरणे आहेत. 

3. अन्नाचे पचन अन्न नलिकेत होते. 

4. अन्न पचनास मदत करणाऱ्या रसास पाचकरस असे म्हणतात. 

5. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी या पिकामधे पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते. 

6. डाळी, मांस, दूध यात प्रथिने अधिक असतात. भुईमूग, करडई यामधील तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते. 

8. सर्व पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात. 

9. मोड येताना धान्यातील जीवनसत्वांचे प्रमाण वाढते. 

10.आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढ होण्यास मदत मिळते.

11. ओ.आर.एस. याचा अर्थ ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरुन काढण्याकरिता होतो. 

12. पोटॉशिअम परमँगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

13.खडकापासून मातीचा २,५ सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे ८०० ते १००० वर्षे लागतात. 

14. डोंगर उतारावर घातलेल्या बांधांना ताली किंवा ओटे म्हणतात.

 15. पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी यांनी प्रगट केले.

16. कणाद महषींचा जन्म इसवी सनापूर्वी ६ व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला. 

17. पदार्थांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म कणाला महर्षींनी 'पीलव' म्हटले आहे. 

18. उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थाना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. 

19. उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणान्या पदार्थाना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

20. लोखंडाप्रमाणेच कोयाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात. 

21. पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणाऱ्या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात. 

22. बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार यात मोडतात.

 23. लोखंडी पत्रे, नळ व इतर वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावल्या जातो.

24. तांब्या-पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.

इयत्ता सहावीतील उपयुक्त मुद्दे लवकरच घेऊन येत आहोत.


अभ्यासु विद्यार्थी यांचेसाठी कामाच्या व्यापात सुध्दा अभ्यास व्हावा यासाठी घेवुन आलो आहे आॅडीओ क्लिप मराठी मधुन या ओळीवर क्लिक करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking