४७. एखाद्या अणूमधील एकूण प्रोटॉनच्या संखेला अणुअंक म्हणतात व तो 2 या संज्ञेने दर्शविला जातो.
४८. सारखाच अणुअंक परंतु वेगळा वस्तुमानांक असणाऱ्या अणूंना समस्थानिक असे म्हणतात.
४९. हायड्रोजन च्या इतर दोन समस्थानिकांना स्वतंत्र नावे असून ती ड्युटेरियम व ट्रिटिअम अशी आहेत.
५०. क्लोरिनचे सरासरी अणुवस्तुमान ३५.५ एवढे आहे.
५१. रेणुवस्तूमानालाच पूर्वी रेणुभार म्हणत. एकक u
५२. अणू वा रेणूंची सापेक्ष संख्या समजण्यासाठी वैज्ञानिकांनी ग्रॅम मोल ही संकल्पना विकसित केली.
५३. पदार्थाच्या एक ग्रॅम-मोल एवढ्या राशीत असणाऱ्या रेणूंच्या संख्येसाठी N संज्ञा वापरतात. या वैशिष्ट्यपूर्ण संख्येला अॅव्होगड्रोअंक म्हणतात.
५४.आजपर्यंत माहीत असलेली एकूण मूलद्रव्ये जवळपास ११६ आहेत.
५५. मूलद्रव्याच्या व्यवस्थितरित्या केलेल्या मांडणीलाच 'वर्गीकरण' म्हणतात.
५६. मूलद्रव्याचे गुणधर्म हे त्यांच्या अणुभारांकांचे आवर्तीफल होय.
५७. गतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. स्थानांतरणीय गती, घूर्णन गती, दोलन गती.
५८. स्थानांतरणीय गती एकरेषीय असू शकते व तिचा मार्ग वक्राकारही असू शकतो.
५९. अंतर ही अदिश राशी आहे तर विस्थापन ही सदिश राशी आहे.
६०. ज्या भौतिक राशींचे मापन दुसऱ्या राशींवर अवलंबून नसते त्यांना मूलभूत राशी असे म्हणतात. उदा. लांबी, वस्तुमान, वेळ, इ.
६१.एका वस्तूने एकक काळात कापलेल्या अंतरास त्या वस्तूची 'चाल किंवा 'सरासरी चाल'म्हणतात.
६२. एखाद्या वस्तूने एकक काळात एखाद्या विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास त्या वस्तूचा वेग अथवा सरासरी वेग म्हणतात.
६३. वेगामधील बदलाचा दर म्हणजे त्वरण आहे.
६४. जर वस्तूच्या वेगात वाढ होत असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन (+ve) होत असते.व वस्तूचा वेग कमी होत असेल तर त्वरण (-ve) ऋण असते.
६५. जी भौतिकराशी केवळ परिमाणाच्या सहाय्याने पूर्ण व्यक्त करता येते तिला 'अदिश राशी' किंवा 'अदिश' असे म्हणतात.
६६. अदिश राशींची बेरीज-वरजाबाकी अंकगणिताचे नियम वापरुन करता येते.
६७. अदिश राशी-वस्तुमान, चाल, कार्य, आकारमान, घनता, वेळ, अंतर, ऊर्जा,
६८. जी भौतिक राशी पूर्णपणे व्यक्त करण्यासाठी तिचे परिमाण व दिशा या दोन्हींची आवश्यकता असते तिला 'सदिश राशी' किंवा 'सदिश' असे म्हणतात.
६९. सदिश राशी - विस्थापन, वेग, त्वरण, बल, गती, वजन,
७०. सदिश राशी दर्शविण्यासाठी डोक्यावर बाण काढलेल्या चिन्हाचा वापर केला जातो.
७१. गतीविषयक तीन समीकरणे १) v= u + at 3) sut + 1 2 at2 ३)v=ur+2as
७२. एखाद्या वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा सरल रेषेतील एकसमान गतिमान अवस्थेत बदल घडवून आणणारी किंवा बदल घडवून आणण्याची प्रवृत्ती असलेली भौतिक राशी म्हणजे 'बल' होय.
७३. प्रत्येक वस्तू तिच्या गतिमान अवस्थेतील बदलाला म्हणजेच त्वरणाला विरोध करते. विरोध करणाऱ्याच्या या वृत्तीला जडत्व असे म्हणतात.
७४. वस्तूमान आणिवेग यांच्या गुणाकाराला संवेग म्हणतात.
७५. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.
७६. एकक वस्तुमानात एकक त्वरण निर्माण करणाऱ्या बलास एकक बल असे म्हणतात.
७७. MKS पद्धतीत 1 kg वस्तुमानात 1 m/s त्वरण निर्माण करणार्या बलास एक न्यूटन बल असे म्हणतात.
७८. एखाद्या वस्तुमानावरील कार्यरत बल हे त्या वस्तूच्या वस्तुमानास व तिच्यावरील परिणामी त्वरणास समानुपाती असते.
७९. प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्याच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. उदा. रॉकेट किंवा अग्निबाण,
८०. दोन वस्तूंची टक्कर झाली तर त्या वस्तूंचा आधातापूर्वीचा एकूण संवेग डा. त्यांच्या आधातानंतरच्या एकूण संवेगाइतकाच असतो. CO
८१. निसर्गात आढळणाऱ्या आणि परस्परांपासून भिन्न असणाऱ्या सर्व बलांचे चार मुख्य प्रकार आहेत. १) गुरुत्वबल, २) विद्युत चुंबकीय . ३) केंद्रकीय बल, ४) क्षीण बल. सर्वांसाठी न्यूटन (N) हे एकक वापरले जाते.
८२. न्यूटन यांनी गुरुत्वबलाचा शोध घेतला.
८३. प्रयुक्त आकृर्षणबलास 'गुरुत्ववल' म्हणतात.
८४. पृथ्वीचे गुरुत्वबल हे चंद्राच्या गुरुत्वबलापेक्षा अधिक असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.