महापौर Mayor
महानगरपालिकेच्या प्रमुखास 'महापौर असे म्हणतात. महापौराची निवड महानगरपालिकेचे सभासद करतात. उपमहापौराची निवडही त्याचवेळी करतात. या दोन्ही पदाधिकाऱ्यांची निवड अडीच वर्षासाठी होते.
महापौर सभांचे अध्यक्षस्थान स्वीकारतो व कामकाजाचे नियमन करतो. महापौराचे पद हे प्रतिष्ठेचे आणि सन्मानाचे मानले जाते. महानगरपालिकेचा कारभार वेगवेगळ्या समित्यांमार्फत चाललो.
प्रत्येक महानगरपालिकेत एक स्थायी समिती असते. महानगरपालिकेचे सर्व धोरणविषयक निर्णय ती घेते. त्याखेरीज
पाणीपुरवठा, आरोग्य, परिवहन, शिक्षण वगैरे विषयांसाठी महानगरपालिका विषय समित्यांची नेमणूक करते. त्याचबरोबर महानगरपालिका प्रभाग समित्यांचीही नेमणूक करते. प्रत्येक प्रभाग समितीत दोन वा अधिक प्रभागांचे प्रतिनिधी असतात.
शहरातील पहिला नागरिक महापौर समजला जातो. महापौर हा शब्द वि. दा. सावरकर यांनी सुचविला. महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्त यांना, तर उपमहापौर आपला राजीनामा महापौर यांना सादर करतो.
महापौरांची कार्ये :
हा शहराचा प्रथम नागरिक असतो. महानगराचा कार्यकारी प्रमुख, महानगरपालिकेच्या बैठका बोलावणे, अध्यक्ष, सह्या करणे. बैठका नियंत्रित ठेवणे. महापौराच्या गैरहजेरीत उपमहापौर सर्व कामे पाहतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.