KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

मुख्य कार्यकारी अधिकारी Chief Executive Officer (CEO)


 मुख्य कार्यकारी अधिकारी
 

जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय प्रमुखाला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणतात. तो जिल्हाधिकाऱ्याच्या दर्जाचा अधिकारी असून भारतीय प्रशासकीय सेवेमधून त्याची नेमणूक केली जाते. त्याला मदत करण्यासाठी एक किंवा अधिक उपमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विविध खात्यांसाठी अनेक अधिकारी असतात. एकाहून अधिक असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्या पैकी एक अधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव असतो. इतर अधिकाऱ्यांमध्ये कार्यकारी अभियंता, आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी, शिक्षण अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, इत्यादी अधिकारी असतात. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी/ इतर दुसऱ्या संवर्गातील सेवेतील अधिकाऱ्यांना दोन महिनेरजेवर जाता येते. त्याहून अधिक काळ रजेवर जायचे असेल तर ती रजा मंजूर करण्याचे अधिकार स्थायी समितीच्या सभापतींना असतात. अशा अधिकार्यांना ४ महिन्यापेक्षा जास्त दिवस रजेवर जाता येत नाही. त्यापुढील काळातील लागणारी रजा राज्यशासनाच्या परवानगीने घेतली जाते. 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची कार्ये

(१) राज्य शासन आणि जिल्हा परिषद यांच्याकडील फंडाचा योग्य कामासाठी विनियोग करणे आणि त्याची अंमल बजावणी करणे हे सीईओचे प्रामुख्याने महत्त्वाचे काम आहे. 

(२) सर्व कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे व त्यांच्याकडून कामे करवून घेणे, 

(३) शासनाला जिल्हा परिषदेच्या कामाचा अहवाल सादर करणे, 

(४) शासनाच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचे कामकाज कसे सुरळीत होईल हे पाहणे. 

(५) ग्रामपंचायतीच्या कामाची तपासणी करणे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking