ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो. पंचायतीच्या सर्व कारभारावर त्यांचे नियंत्रण असते. तो जि. प. चा सेवक असतो. त्याची नेमणूक मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. करतात.ग्रामसेवक यांची बदलीचा जि. परिषदेलाच आहे. ग्रामसेवकाकडे दोन किंवा तीन ग्रामपंचायतींची जबाबदारी सोपविण्यात येते. ग्रामसेवकाच्या मदतीस कारकून तसेच तत्सम सेवक वर्ग असतो. त्यांच्या मदतीने तो ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असतो. ग्रामसेवकांची वेतनश्रेणी शासनाने निश्चित केलेली आहे. इतर नोकरांचा पगार निश्चित करण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी भविष्यनिर्वाह निधीची तरतूद आहे.
निवड - ग्रामसेवकाची निवड व नियुक्ती १९८८ सालापर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करीत असत. प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळाच्या निर्मितीनंतर त्याची निवड या मंडळामार्फत होत असे. हल्ली जिल्हा निवड समिती ही निवड करते व नियुक्ती सीईओ करतो.
ग्रामसेवकाचे नियंत्रण : बी. डी.ओ. निलंबन - सी.ई.ओ.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.