राज्यपाल
राज्याचा घटनात्मक प्रमुख / कार्यकारी मंडळाचा प्रमुख राज्यपाल असतो.
राज्याचा प्रमुख अधिकारी राज्यपाल असतो.
राज्याचा संपुर्ण कारभार राज्यपालाच्या नावाने चालतो.
राज्यपालांची नेमणुक राष्ट्रपती करतो. एकच व्यक्ती दोन राज्यांसाठी
राज्यपाल म्हणुन नियुक्त केल्या जाऊ शकतो.
राज्यपालाची नेमणुक ५ वर्षासाठी केली जाते.
राज्यपाल पदासाठी वयाची ३५ वर्षे पुर्ण केलेली असावीत.
राज्यपालास मुख्य न्यायाधीशासमोर शपथ घ्यावी लागते.
राष्ट्रपतीचा प्रतिनिधी म्हणुन राज्यपाल राज्यामध्ये काम पाहत असतो.
राज्याचे वैधानिक अधिकार राज्यपालास असतात.
राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नेमणुक करतो.
राज्यातील कोणताही कायदा राज्यपालाच्या पुर्वसंमतीशिवाय संमत होऊ शकत नाही.
विधिमंडळाचे अधिवेशन चालु नसताना राज्यपाल अध्यादेश काढु शकतो- कलम २१३
राज्यपाल विधानसभेवर अँग्लो इंडियन समाजातील एका सदस्याची नियुक्ती करतो.
राज्यपालाच्या शिफराशी शिवाय विधिमंडळात कोणतेही धनविधयेक सादर करता येत नाही.
राज्याचा अकस्मिकता निधी-कलम२६६ राज्यपालाच्या अखत्यारित असतो.
राज्यपाल हा संघराज्य व घटकराज्य यामधील दुवा असतो.
राज्यपालाचा वटहुकुम ६ आठवडे अंमलात राहु शकतो.
विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार राज्यपालास आहे.
राज्यपालास राष्ट्रपती पदच्युत करु शकतो.
राज्यपाल आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे सादर करतो.
राज्यपालाचे वेतन व भत्ते राज्याच्या संचित निधीतुन दिले जाते.
राज्यपालाचे वेतन- १,१००००/- लोकायुक्त व उपलोकायुक्त यांची नेमणुक राज्यपाल करतो.
घटनेतील कलम-१६३ अन्वये राज्यपालाला स्व - विवेकाधिकार बहाल केले आहेत
घटकराज्यात राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपालच राष्ट्रपतीच्या वतीने घटकराज्याचा राज्यकारभार चालवीत असतो.
कलम-१५३ नुसार राज्यपाल या पदाची तरतुद घटनेत करण्यात आली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.