सामान्य विज्ञान इयत्ता आठवी
२२. 'इस्ञो' या संस्थेमार्फत आतापर्यंत २१ उपग्रह सोडण्यात आले.
२३. GMRT म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.
२४. टाटा इन्स्टियूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोड़द येथें बसविली
२५. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणांसाठीचा करार १९७५ पासून अमलात आला आहे.
२६. जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील मधील रिओ-द-जानिरो येथे झालेल्या १९९२ च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या
२७. ५ मार्च १८७२ रोजी जॉर्ज वेस्टिंग हाऊस या संशोधकाने रेल्वेसाठी एअर ब्रेक प्रथम वापरले.
२८. चुंबकाकडे लोह, निकेल, कोबाल्ट या धातूंचे तुकडे आकर्षित केले जातात.
२९. मोकळ्या टांगलेल्या स्थितीमध्ये दक्षिणो त्तर स्थिर राहणे, हे चुंबकाचे वैशिष्ट्य आहे.
३०. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे सर्व अणूतील मूलकण आहेत.
३१. अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात.
३२. प्रोटॉन धनप्रभारित, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारित तर न्यूट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
३३. अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणूतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
३४. अणुवस्तूमानांक म्हणजे अणूतील प्रोटॉन आणि न्यूट्ॉन यांच्या संस्यावी बेरीज,
३५. मूलद्रव्याच्या समस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणुवस्तुमानाम भिन्न असतो.
३६. मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा म्हणतात.
३७. विषाणूभोवती प्रधिनांचे आवरण असते.
३८. जीवाणूंमध्ये केंद्रकाऐवजी मुक्त गुणसुत्रे असतात.
३९. स्टॅफिलोकोकस जीवाणू खाद्यपदार्थांवर वाढताना एन्टेरोटॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करतात.
४०.पेनिसिलीन नावाचे प्रतिजैविक पेनिसिलिअमपासून बनवले गेले आहे.
४१. प्रतिजैविक
*पेनिसिलिन -सूक्ष्मजीवं-पेनिसिलिअम क्रायसोजिनम-पासुन नाश होणारे रोगजंतू घटसर्प, न्यूमोनियाचे रोगजंतू
*क्लोरोमायसेटिन-सूक्ष्मजीवं-स्ट्रेप्टोमायसिस व्हेनेझुएले - पासुन नाश होणारे रोगजंतु विषमज्वराचे रोगजंतू
*स्ट्रेप्टोमायसिन -सूक्ष्मजीवं--सूक्ष्मजीवं-स्ट्रेप्टोमायसिस ग्रासिस-पासुन नाश होणारे रोगजंतु
*टेट्रासायक्लिन -सूक्ष्मजीवं-स्ट्रेप्टोमायसिस ऑरिओफेंसिस-पासुन नाश होणारे रोगजंतु विविध रोगजंतू
*एरिथ्रोमायसिन -सूक्ष्मजीवं- स्ट्रेप्टोमायसिस एरिथ्रस -पासुन नाश होणारे रोगजंतु विविध रोगजंतू
४२. साधीचे रोग कॉलरा, विषमज्वर, इन्फ्ल्युएंझा, हगवण, डोळे येणे, इ. ४३. संसर्गजन्य रोग - क्षय, इन्फ्ल्यु एंझा, इ.
४४. संपर्कजन्य रोग - खरुज, इसब, गजकर्ण, इ.
४५. पिसाळलेला कुत्रा, माकड, मांजर किंवा ससा यांच्या चावण्यामुळे रेवीज होतो.
४६. रॉबर्ट कॉक याने क्षय रोगाचे जीवाणू शोधून काढले.
४७. WHO तर्फे क्षयरोग निर्मुलन कार्यक्रम राबविला जातो. त्यासाठी DOT केंद्रे काढली आहेत. (Directly Observed Treatment)
४८. मनुष्यप्राणी 'व्हिब्रिओ कॉलरा' या कॉलऱ्याचा जीवाणू वाहक आहे.
४९. लसीकरण बीसीजी, त्रिगुणी पोलिओ, गोवर, द्विगुणी, धनुर्वात, काविळ-ब.
५०. त्रिगुणी लस घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला या रोगांस प्रतिबंध करते.
५१. द्विगुणी लस घटसर्प, धनुर्वात या रोगास प्रतिबंध करते.
५२. १९८६ साली फ्रान्समधील डॉ. माँटेनिअर आणि अमेरिकेतील डॉ. गॅलो यांनी एकाचवेळी HIV विषाणू शोधला.
५३. १९८६ पासून जागतिक एडस् नियंत्रण कार्यक्रमाची
५४. समांतर आरशापासून अगणित प्रतिमा मिळतात. सुरुवात झाली.
५५. जीवाश्म इंधन स्थायू, द्रव आणि वायू या तीन अवस्थांत पृथ्वीच्या पोटाल सापडते.
५६. १ किलोग्रॅम लाकडापासून सुमारे १७०० किलो ज्यूल एवढी उर्जा मिळते.
५७. चारकोल म्हणजेच लोणारी कोळसा किंवा लाकडी कोळसा.
५८. वातावरणातील ओझोनच्या थराला छिद्रे पडून ल्यातून हानिकारक किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचू लागली आहेत.
५९. युरेनिअमच्या अणूंवर न्यूट्रॉन्सचा मारा केल्यास त्यातून अणुऊर्जा मिळते.
६०.महाराष्ट्रात तारापूर येथे तर गुजरातमध्ये काकरापूरमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आहे.
६१. साधा विद्युत घट - यामध्ये जस्ताची पट्टी ऋण धुव तर तांब्याची पट्टी धन ध्रुव म्हणून काम करते.
६२. लेकलशे विद्युतघट-यामध्ये मँगनीज डायॉक्साईड आणि कार्बन यांचे मिश्रण धन ध्रुव म्हणून वापरले जाते तर जस्ताची दांडी घटाचा ऋण ध्रुव असतो.
६३. कोरडा विद्युतघट - जस्ताचे आवरण म्हणजे ऋण धुव तर कार्बन कांडी धन ध्रुव
६४. निकेल - कॅडमिअम घट - कॅडमिअम हा ऋण ध्रुव तर निकेल हा धन ध्रुव.
६५. बटन सेल - लिथियम आयर्न फॉस्फेट ऋण ध्रुव तर कार्बन हा धन धुव.
सामान्य विज्ञान विषयातील नविन नोस्ट लवकरच उपलब्ध करुन दिल्या जातील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.