KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

सामान्य ज्ञान भाग - 12


 सामान्य विज्ञान नोस्ट

१७. सामाईक इलेक्ट्रॉनना स्वत:कडे आकर्षित करण्याच्या अणूच्या क्षमतेला या मूलद्रव्याची विद्युतऋणता म्हणतात. 

१८. आयनिक संयुगे पाण्यात विरघळल्याने आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला विचरण संबोधतात. 

१९. शुद्ध पाणी विजेचे दुर्वाहक असतात.

२०. रेणूपासून आयन विलग होण्याच्या प्रक्रियेला आयनीभवन असे म्हणतात. 

२१. अणूने किंवा अणूंच्या गटाने एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन दिले असता किंवा घेतले असता तयार होणाऱ्या अयनांना 'मूलक' असे म्हणतात. 

२२. धन आयन किंवा मूलके यांनाच कॅटायन (cation) किंवा आम्लारिधर्मी मूलके असे देखील म्हणतात. 

२३. ऋण आयन किंवा मूलके यांनाच अॅनायन किंवा आम्लधर्मी मूलके असे देखील म्हणतात. 

२४, साधे मूलक एका अणूपासून बनलेले असते व ते धनप्रभारित किंवा ऋण प्रभारित असते. 

२५. संयुक्त मूलकांमध्ये अणूंचा गट असतो व तो गट दोन किंवा अधिक प्रकारच्या अणूंपासून तयार झालेला असतो ते धन प्रभारित वा ऋण प्रभारित असतात.  

२६. पदार्थामध्ये होणार्या ज्या बदलात त्याचे फक्त भौतिक गुणधर्म बदलतात, कोणताही नवा पदार्थ तयार होत नाही आणि मूल पदार्थ सहजासहजी परत मिळतो अशा बदलास भौतिक बदल म्हणतात

२७. उदाहरणे-मीठ पाण्यात विरघळणे, पाण्याचे बर्फात रुपांतर होणे, पाण्याचे वाफेत रुपांतर होणे, इ. २८. ज्या मदलामध्ये भाग धेणाऱ्या पदार्ाचे रुपांतर नवीन पदार्थामध्ये होते व नवीन तयार झालेल्या पदार्थाचे गुणधर्म हे मूळ पदार्थपिक्षा पूर्णपणे वेगळे असतात, अशा बदलाला रासायनिक बदल म्हणतात. 

२९. उदाहरणे - स्वयंपाकाचा मेस जलणे केरोसीन जळणे, दुधापासून दही होणे, अन्नपदार्थ आंबणे, अन्नपदार्थाचे पचन होणे. 

३०.रासायणिक अभिक्रियेत उष्णता मुक्त होते अशांना उष्मादायी अभिक्रिया म्हणतात. 

३१.रासायणिक अभिक्रियेत उष्णता शोषली जाते अशांना उष्माग्राही अभिक्रिया म्हणतात. 

३२. रासायनिक अभिक्रिया म्हणजे अभिक्रिया यांचे तपशीलनुसार विवेचन आहे.

३३. समीकरणाच्या डाव्या बाजूस अभिक्रियाकारके व उजव्या बाजूस उत्पादिते लिहीतात.

३४. संतुलित समीकरणामध्ये अभिक्रिया कारके , उत्पादिते यांच्यातील प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूंची संख्या दोन्ही बाजूला सारखीच असते.

३५. ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये दोन किंवा अधिक अभिक्रियाकारक यापासून एकच उत्पादित मिळते अशा अभिक्रियांना 'संयोग अभिक्रिया' असे म्हणतात. 

३६. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकच संयुग यापासून दोन किंवा अधिक साधे पदार्थ मिळतात त्या अभिक्रियेला 'अपघटन अभिक्रिया'असे म्हणतात. 

३७. एखाद्या पदार्थातील अणू, अणुगट, दुसऱ्या पदार्थातील अणू व अणुगट यांची जागा घेऊन नवीन पदार्थ तयार करत असतील,अशा अभिक्रियांना 'विस्थापन अभिक्रिया'म्हणतात. 

३८. ज्या रासायनिक अभिक्रियेत दोन संयुगांच्या घटकाची आपापसात अदलाबदल होऊन दोन नवीन संयुगे तयार होतात अशा अभिक्रियांना 'दुहेरी अपघटन' अभिक्रिया म्हणतात, ३९. ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी जास्त कालावधी लागतो अशा अभिक्रियांना 'मंद अभिक्रिया' म्हणतात. उदा, भाजीपाला कुजणे, लोखंड गंजणे, दही होणे. 

४०. ज्या रासायनिक अभिक्रियांना पूर्ण होण्यासाठी खूपच कमी कालावधी लागतो. त्यांना शीघ्र अभिक्रिया म्हणतात. उय ब्लिचिंग पावडरची प्रक्रिया. 

४१. रासायनिक अभिक्रियेत, अभिक्रिय कारकांच्या उत्पादित संहतीमध्ये एकक कालावधीत घडून येणारा बदल म्हणजेच 'रासायनिक अभिक्रियेचा वेग' होय. 

४२. अभिक्रिया कारकांचे स्वरूप किंवा क्रियाशील ना रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर परिणाम करते. ४३. रासायनिक अभिक्रियेत भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारकांच्या कणांचा आकार जेवढा लहान असेल तेवढा अभिक्रियेचा वेग जास्त असतो. ४४. अभिक्रिये चे तापमान वाढविल्यास अभिक्रियेचा वेगदेखील वाढतो. 

४५. ज्या पदार्थांच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो/ बदलतो परंतू त्या पदार्थांमध्ये कोणताही रासायनिक बदल होत नाही, अशा पदार्थांना उत्प्रेरक असे म्हणतात. 

४६. उत्प्रेरकामुळे रासायनिक प्रक्रि ये चा वेग वाढतो किंवा ती प्रक्रिया कमी तापमानाला होते. 

४७. अपमार्जकांमध्ये (Detergent) चिकरांचा (Enzymes) उत्प्रेरक म्हणून उपयोग करतात. 

४८. आपले स्नायू, त्वचा, केस यांची जडणघडण करणारे प्रोटीन म्हणजे कार्बनी संयुगे असतात. 

४९. आपला अनुवंशिकीय वारसा ठरविणारी RNA व DNA ही न्युक्लिइक आम्ले कार्बन संयुगे असतात. 

५०. आपण खातो ते अन्न घटक म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन मेदयुक्त पदार्थ व जीवनसत्वे ही कार्बन संयुगे असतात. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking