सामान्य विज्ञान इयत्ता सातवी महत्वाचे मुद्दे
67. निसर्गात आढळणारे दर्शक - लिटमस, हळद लिटमस हा दर्शक लायकेन वनस्पतीपासून मिळवतात. 68. पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना अल्कली म्हणतात.
69. लिंबू, संत्री, मोसंबी, या फळात सायट्रीक अॅसिड असते.
70. जेव्हा जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत चुनकळी टाकतात. जर जमीन आम्लारीधर्मी असेल तर जमिनीत सेंद्रीय द्रव्ये मिसळतात.
71. 4°C ला पाण्याची घनता महत्तम असते.
72. जहाजावर किती माल भरावा याची सुचना करण्यासाठी जुहाजाच्या खालच्या भागावर रेषा आखलेल्या असतात. त्यांना प्लीम सोल रेषा म्हनुण संबोधतात.
73. लोलकातून गेल्यावर सूर्याचा प्रकाश सात रंगात विभागला जावुनाात्यामध्ये तांबडा रंग वर असतो तर जांभळा रंग सर्वात खाली असतो.
रंगाचा क्रम - 1.तांबडा, 2.नारंगी, 4
3.पिवळा, 4.हिरवा, 5.निळा, 6.पारवा, 7.जांभळा
74. उष्णतेचे स्थलांतर तीन प्रकारे होते वहन, अभिसरण, प्रारण,
75. थर्मासफ्लास्क यामधे गरम अथवा थंड वस्तूंच्या तापमानामधे फरक न पडता दीर्घकाळ त्याच तापमानावर गरम असेल तर गरम व थंडच असेल तर दिर्घकाळ थंड राहते.
76. गरम पदार्थ गरम ठेवण्यासाठी जी भांडी वापरतात त्यांना थर्मोवेअर म्हणतात.
77. उष्णतेचे सुवाहक समोरिल प्रमाने- तांबे, लोह, अॅल्युमिनिअम, इ.
उष्णतेचे दुर्वाहक समोरिल प्रमाने- माती, लाकूड, काच, इ.
78. रक्त देण्याची प्रक्रिया म्हणजे रक्तदान व रक्त घेण्याची प्रक्रिया रक्त पराधन आहे.
79. रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यांस चक्कर येते.
80. प्रजनन मुख्यत्वे खालील दोन प्रकारचे असते.
1.[पहिला प्रकार -अलैंगिक प्रजनन त्यामधे वनस्पती व प्राणी असे दोन उपप्रकार पडतात.त्यामधील वनस्पती उपप्रकाराचे उपप्रकार
1.शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शेवंती) , पानापासून (पानफुटी, कलेंचा).
2. विभाजन - एकपेशी, सजीव, जीवाणू, शैवाल
3.कलिकायन - किण्व, यीस्ट क्लोरेल्ला
4.बीजाणूजन्य - बुरशी
5.खंडीभवन - शैवाल, स्पायरोगायरा
व त्यानंतर अलैंगिक प्रजननातील दुसरा प्रकार
*2.प्राणी - उदा. अमीबाचे विभाजन, जलव्यालाचे कलिकायन ]
2.[लैंगिक प्रजनन यामधे दोन उपप्रकार पडतात.
1.वनस्पती - सपुष्पा वनस्पतीमधे फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो. व
2. प्राणी - नर आणि मादीच्या संयोगातुन गर्भाशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतुन नवीन जीव तयार होतो.
81.पदार्थ
पाणी -द्रवणांक 0°c उत्कलनांक 100°c
लोह -द्रवणांक 1535 °c उत्कलनांक 2750°c
तांबे -द्रवणांक 1082°c उत्कलनांक 2310°c
शिसे -द्रवणांक 327 °c उत्कलनांक 1740°c
पारा -द्रवणांक -39°c उत्कलनांक 357°c
82.पदार्थ विशिष्ठ उष्मा
पाणी - विशिष्ठ उष्मा 1
पारा - विशिष्ठ उष्मा 0.033
लोह - विशिष्ठ उष्मा 0.0125
काच - विशिष्ठ उष्मा 0.200
कोरोसीन - विशिष्ठ उष्मा 0.505
83. वृकाचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला डायलेसिस (व्याप्लेषण) म्हणतात.
84. बल्बच्या दिव्यात टंगस्टनधी तार असते. टंगस्टनची संज्ञा W आहे. बुलफ्रॅम (Wolfram) या जर्मन नावावरुन ती घेतली आहे.
85. आंदोलन काल (T) हे दोलकाच्या लांबीवर अवलंबून असते. लांबी वाढवली की काल वाढत असतो.
86. कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी ऐकू शकतात.
87. परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तित दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.
89. जे सजीव स्वत:चे अन्न स्वतः तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. व ज्या सजिवांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी असै संबोधतात.
90. विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रासायनिक पदार्थाचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरुन काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मीकरण म्हणतात.
91. पचनसंस्था ग्रंथी/इंद्रिय
लाळगंथी-पाचकरस लाळ-पिष्टमय पदार्थाचे विघटन करणे
पित्ताशय - पाचकरस पित्त-अन्न आम्लीय करणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे.
स्वादुरपिंड - पाचकरस इन्शुलिन-रक्तातील साखरेचे प्रमाण नियंञित ठेवणे.
मोठे आतडे - पाचकरस आंत्ररस-प्रथिने, मेदाचे विघटन होऊन तयार झालेले पदार्थ शोषणे
92. हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायॉँक्साईड, प्रकाश, हरितद्रव्य, पाणी या घटकाची गरज असते.
93. आयोडिन द्वावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.
94. पिश्मय पदार्थ
- पिष्ट, विविध शर्करा, तंतुमय पदार्थ यांचा समावेश येतो.
-तांदूळ, गहू, मका, बाजरी, ज्वारी या तृणधान्यांमध्ये पिष्ट भरपूर असते. -पिष्टमय पदार्थाचे विघटन होऊन त्यांचे ग्लुकोजमध्ये रुपांतर होते.
-जरुरीपेक्षा जास्त झालेल्या ग्लुकोजचे रुपांतर ग्लायकोजेनमध्ये होऊन यकृतात साठवले जाते. -पिष्टमय पदार्थापासून ऊर्जा मिळते. 95. प्रथिने
- तूर, हरभरा, मटकी व सोयाबीन या डाळी तसेच दूध अंडी, मासे व मांस यांपासून प्रथिने मिळतात.
- विविध जैवरासायनिक क्रिया घडवून आणण्यास मदत करणारी विकरे हे मुळात प्रथिनेच असतात.
96. स्निग्ध पदार्थ तेल, तूप, लोणी, मेद व मेदाम्ले ही उदाहरणे. -स्निग्ध पदार्थांच्या विघटन झाल्यामुळे ऊर्जा प्राप्त होते.
शब्द मर्यादेमुळे नविन पोस्ट केली जाईल.धन्यवाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.