KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

पद्मविभूषण,पद्मभूषण,पद्मश्री,शौर्य पदके Padma Vibhushan, Padma Bhushan, Padma Shri, Medal of Valor

 


पद्मविभूषण,पद्मभूषण,पद्मश्री,शौर्य पदके Padma Vibhushan, Padma Bhushan, Padma Shri, Medal of Valor

पद्मविभूषण 

पद्मविभूषण हा देशातील द्वितीय क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. 

२०१४- डॉ.रघुनाथ माशेलकर व बी.के.अय्यंगार 

पद्मभूषण 

पद्यभूषण तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान २०१४ कमल हसन,अनिता देसाई,बेगम परवीन सुलताना,पुलेला गोपीचंद,लियांडर पेस, रस्किन बाँड, न्या.जगदीश शरण वर्मा, डॉ.श्रीमती नीलम खेर आदींसह एकूण २६ जणांना. 

पद्मश्री 

पद्मश्री चौथ्या क्रमांकाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. 

२०१४ - पं.विजय घाटे,कै.नरेंद्र दाभोळकर, युवराज

सिंग,अंजुम चोप्रा, सुदर्शन पटनाईक, विद्या बालन, परेश रावल,उस्ताद मोईनुद्दीन खान, दिपीका पल्लीकल, प्रताप सिंह आदींसह एकूण १०१ जणांना. 

भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री हे पुरस्कार कुठल्याही क्षेत्रात विशेष, असाधारण कामगिरी केल्याबद्दल देतात. 

शौर्य पदके 

परमवीर चक्र हे देशातील सर्वोच्च लष्करी पदक होय. 

महावीर चक्र हे देशातील द्वितीय क्रमांकाचे सर्वोच्च लष्करी पदक होय. वीर चक्र हे देशातील तिसऱ्या क्रमांकाचे पदक होय. 

वरील ३ ही पदके तिन्ही सेनादलातील अधिकाऱ्यांना देतात. 

वरील ३ पदके शत्रूशी लढतांना दाखविलेल्या शौर्याबद्दल मिळतात.  परमीवर चक्र, महावीर चक्र, व वीरचक्र हे छातींच्या डाव्या बाजूला लावतात. 

खालील पदके शत्रुशी लढण्याव्यक्तीरिक्त अथवा रणांगणाशिवाय चे पदके 

१) अशोक चक्र : सर्वोच्च पदक - सुवर्णाचे गोलाकार 

२) कीर्तीचक्र : द्वितीय क्रमांकाचे पदक - चांदीचे 

३) शौर्यचक्र : तिसरे क्रमांकाचे पदक - ब्राँझचे 

मेजर सोमनाथ शर्मा : पहिले परमीवर चक्र १९४७ (नोव्हें) 

मेजर रामस्वामी परमेश्वरन (मरणोत्तर) १९८७ (नोव्हें) श्रीलंका शांतीसेना करवाई 

परमवीरचक्र हा ब्रिटिश व्हिक्टोरिया क्रॉमच्या बरोबरीचा भारतीय पुरस्कार आहे. 

कारगिल युध्दातील कॅप्टन सचिन निबांळकर (उमरगा) यास वीरचक्र दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking