सामान्य विज्ञान इयत्ता सातवी मागील पोस्ट सलग करत आहोत.
21. आधाराभोवती हालणाऱ्या आणि न वाकणाऱ्या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.
22. कार्य करण्याच्या क्षमतेला उर्जा असे म्हणतात.
23. पदार्थाच्या ताणामुळे/स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज उर्जा असे म्हणतात.
24. गतीज उर्जेचा वापर करुन डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.
25. पारंपारिक उर्जा स्तोरोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल अपारंपारिक उर्जा स्त्रोत - सूर्य, वारा, अणुऊर्जा, बायो-डिझेल, गोबरगॅस, समुद्रलाटा, पाणी.
26. ठराविक काम एकत्रपणे करणाऱ्या इंद्रिय समुहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात.
27. लाळेमध्ये टायलीन नावाचा पाचकरस असतो.
28. पिष्टमय पदार्थाचे ग्लुकोज म्हणजेच साखरेत रुपांतर होते.
29. यकृतामध्ये पित्तरस तयार होतो तर स्वादुपिंडात स्वादुरस तयार होतो.
30. लहान आतड्यामध्ये अन्नपचनाचे काम होते.
31. आठ ग्रह - पृथ्वी, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि, युरेनस, नेपच्युन
32. पृथ्वी सूर्यापासून सुमारे 15 कोटी किमी अंतरावर आहे.
33. वातावरणातील नायट्रोजनपासून नायट्रेटसूची निर्मिती होते.
34. पृथ्वीचा 71 % भाग पाण्याने व्यापलेला आहे.
36. भू-कवचाची जाडी जमिनीखाली सुमारे 30 ते 70 किमी आहे. तर समुद्राखाली 5 ते 7 किमी एवढी आहे. या पापुद्रयात सिलीकाॅन, मॅग्रेशिअम, अल्युमिनिअम सापडते.
36. मध्यावरणाची जाडी सुमारे 70 किमी ते 2900 किमी पर्यंत आहे, पृथ्वीच्या एकूण आकारमानाच्या 82% भाग मध्यावरणात मोडतो.
38. पृथ्वीच्या आकारमानाच्या 16 % भाग गाभ्याचा आहे.
39. महासागराच्या तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे निर्माण होणाऱ्या लाटांना 'त्सुनामी लाटा' म्हणतात.
40. 17 ते 26 किमी उंचीवरच्या वातावरणाच्या थरात ओझोन नावाचा एक वायू असतो. हा थर संरक्षक छत्रीचे काम करत असतो. पृथ्वीवरील ऊष्णता वाढणे, धुव प्रदेशातील बर्फ वितळून समुद्राची पातळी वाढणे, त्वचेचा कॅन्सर होणे इ. धोके टळतात. 16 सप्टेंबर हा दिवस 'जागतिक ओझोन संरक्षण दिन' मानला जातो.
इयत्ता सातवीमधील सामान्य विज्ञान विषयातील महत्वाचे मुद्दे
1.नैसर्गीक साधनस्त्रोत : अनवीकरणीय - हवा, माती, खनिजे, पाणी (निर्माण करणे आवाक्याबाहेरचे असते.)
नवीकरणीय - वनस्पती, प्राणी (पुन्हा निर्माण होऊ शकणारे असतात.)
2. हवा प्रदुषणाने हवेतील कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण वाढत असल्याने जागतिक तापमानवाढीचे संकट उद्भवले आहे.
3. इस्त्राईल मधील जॉर्डन नदीवर कालवे काढून जलसिंचनाची सोय केल्याने वाळवंटी भागात उत्तम शेती करता येते.
4.समुद्राच्या पाण्यात मॅग्नेशिअम क्लोराईड, सोडीअम क्लोराईड हे क्षार असतात.
5. उतारावरील जमीनीवर ठराविक अंतरावर आडवे चर खणून पावसाचे पाणी चरात अडवून धरले जाते यालाच नालाबंडींग असे म्हणतात.
6. 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय्य ऊर्जा दिवस म्हणून पाळला जातो.
7.वनस्पती व प्राण्यातील विशिष्ट जनुके दुसऱ्या वनस्पतीत व प्राण्यात थेट सोडून हव्या त्या गुणधर्माची नवीन प्रजाती प्रयोग शाळेत निर्माण करता येऊ शकते त्याला जैविक तंत्रज्ञान असे म्हणतात.
8. डोडो व भारतीय चित्ता यांची जनुके आपण कायमची हरवून बसलो आहोत.
9. संयुक्त राष्ट्र संघाने दरडोई 50 लि. पाण्याची गरज रोजची असल्याचे सुचवले आहे.
10. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे.
11. 22 मार्च हा जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो.
12. जलाशयाच्या पृष्ठभागावर सेटिल अल्कोहोलचा शिडकावा केल्यास बाष्पीभवन कमी होते.
13. वनस्पतीच्या पानातील हरितद्रव्य हे प्रकाश उर्जेंचे रुपांतर रासायनिक उर्जेत करते.
14. अभ्रक हे उष्णतेचे सुवाहक तर वीजेचे दुर्बाहक आहे.
15. विशिष्ठ वस्तूमानाच्या पदार्थाचे तापमान 1°C ने वाढविण्यास लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची उष्माधारकता म्हणतात.
16. 1 कि.गॅ. पदार्थाचे तापमान 1°C ने वाढविण्यास लागणान्या उष्णतेला विशिष्ठ उष्मा असे म्हणतात.
17. 1. कि.गॅ. पाण्याचे तापमान 1°C ने वाढविण्यासाठी लागणारी उष्णता 1 कि कॅलरी होय.
18. 1 गॅम वस्तुमानाच्या पाण्याचे तापमान 1°C ने वाढवण्यास लागणारी उष्णता 1 कॅलरी होय.
19. वायूंचे प्रसारण हे स्थायू आणि द्रवाच्या प्रसारणापेक्षा अधिक असते. भट्टीचे लापमान मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तापमापीला पायरोमीटर म्हणतात.
(शब्द मर्यादा असल्याने समोरिल पोस्ट लवकरच टाकली जाईल धन्यवाद)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
State your problems.