KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

सामान्य ज्ञान भाग - 13


 सामान्य विज्ञान 

५०. मानव खातो ते अन्न घटक म्हणजे कार्बोहायड्रेट, प्रोटीन मेदयुक्त पदार्थ व जीवनसत्वे ही कार्बन संयुगे होय. 

५१. सुगंधी द्रव्ये, जीवाश्म इंधने, औषधे व किटकनाशके, प्लॅस्टिक व रंजकद्रव्ये अशा विविध प्रकारच्या द्रव्यामध्ये कार्बनसंयुगे असतात. 

५२. कापूस, रेशीम, लोकर, पॉलिस्टर, टेरिलीन, नायलॉन हे आपल्या वस्त्रांचे धागे हे कार्बन संयुगांचेच बनलेले असतात

५३. आपले जीवन 'कार्बन'या मुलद्रव्यावर आधारलेले आहे.

 ५४. कार्यन संयुगाची विविधता प्रचंड आहे, त्यांचा विस्तारं एकच कार्यन अणू असलेल्या मिथेनपासून ते अब्जावधी कार्थन अणू असलेल्या डी.एन.ए. पर्यंत परसलेला आहे. 

५५. कार्बनचा अणुअंक ६ असून त्यातील इलेक्ट्रॉनचे कबर्योनेहाय वितरण २, ४ असे आहे. 

५६. कार्बनची संयुजा ४ आहे. 

५७. कार्बनकडे मालिका बंधन शर्ती असून त्याच्या खूप लाब साखळ्या बनू शकतात. 

५८. म्हणून कार्बनची संयुगे मोठ्या प्रमाणावर तयार होतात य त्यामुळे कार्बन हे अद्वितीय मुलद्रव्य ठरते. 

५९. बहुसंख्य कार्बन संयुगामध्ये सर्वसाधारणपणे सापडणारे मूलद्रव्य म्हणजे हायड्रोजन, सर्वात साध्या कार्बन संयुगामध्ये फक्त कार्बन,हायड्रोजन हे दोनच मूलद्रव्ये आढळतात त्यांना हायड्रोकार्बन असे म्हणतात 

६०. कार्बनच्या चार संयुजांचे समाधान चार स्वतंत्र अणूंशी एके री बंध करुन झालेले असते त्यांना हायड्रोकार्बनना संतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात. 

६१. दुसन्या प्रकारात हायड्रोकार्बनमधील किमान दोन कार्बन अणू एकमेकांशी बहुबंधाने जोडलेले असतात. 

६२. बहुबंधामधील कार्बन अणू हे त्या रेणूमधील इतर कार्बन अणूंपेक्षा वेगळे असतात. 

६३. मिथेन हा सर्वात साधी संरचना असलेला हायड्रोकार्बन होय व त्याच्या रेणूत केवळ एकच कार्बन अणू असतात. 

६४. ईंधन खाणी, कोळसा खाणी, गोबर गेस व बायोगेॅस मध्ये दलदलीच्या पृष्ठभागावर मिथेन असतो. 

६५. ज्वलनशीलतेमुळे मिथेनचा इंधन म्हणून वापर करतात.

६६. हायड्रोजन व अॅसिटिलीन वायूंचे औद्योगिक उत्पादन मिथेनपासून मिळते. 

६७. इथेन हा संतृप्त हायड्रोकार्बन असतो. 

६८. इथिलीनचे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटाच्या किण्वन प्रक्रियेने मिळविले जाते. 

६९. इथिलीनचे मोठ्या प्रमाणावर आधौगिक उत्पादन इथिल अल्कोहोल पासून केले जाते. इथिल अल्कोहोल हे कार्बोहायड्रेटांच्या किण्वन प्रक्रियेने मिळविले जाते.

७॰.पोलिथिन हे इथिलीन पासून बनविले जाते. 

७१. अॅसिटिलीन हा असंतृप्त हायड्रोकार्बन आहे. 

७२. ऑक्सिओंसिटिलीन च्या ज्योतीचे तापमान नैसर्गिक वायू किंवा हायड्रोजन वायूच्या जोतीपेक्षा जास्त असते. 

७३. PVC या बहुवारिकाच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या कार्बन संयुगाच्या औद्यागिक उत्पादनासाठी अॅसिटिलीन वापरला जातो. 

७४. सजीवांमधील रुपिकीय आणि कार्यरुपी विचरणास 'जीवनसृष्टीची विविधता' असे म्हणतात, 

७५. वर्गीकरण म्हणजे सुनियोजित पद्धतीने विविध समूहामध्ये केलेली रचना. या समूहांना वर्गेकक (Taxa) असे म्हणतात. 

७६. कर्गीकरणामधील पदानुक्रमात वर्गेककांचा स्तर पुढील प्रमाणे असतो. जाती, प्रजाती, कुल, गण, वर्ग, विभाग, संघ 

७७. वनस्पती यामधील सर्वात उच्च स्तरीय वर्गेककास 'विभाग' असे म्हणतातव व  प्राण्यातील सर्वोच्च स्तरास संघ (Phylum) असे  म्हणतात. 

७८. सर्वात उच्चस्तरीय वर्गेकक'सृष्टी'(Kingdom)असतात. 

७९. संपुर्ण सजीवांची नावे दोन शब्दांच्या समूहाने दर्शवितात.सुरुवातीचे नावास प्रजाती नाम तर दुसन्या नामास जाती नाम असे म्हणतात. 

८०.मानवप्राण्याचे वैज्ञानिक नाव 'होमो-सेपियन्स'  आहे. 

८१. ही द्विनामसूत्रीय नामकरण पद्धती कॅरोलस लिनियस ने शोधली. 

८२. अॅरिस्टॉटल आणि त्याच्या शिष्य थिओफ्रॅ स्टस् यांनी प्रथमच द्विसृष्टी पद्धतीने वनस्पती व प्राणी यांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. 

८३. आर.एच.व्हिटाकर यांनी पंचसृष्टी पद्धती अस्तित्वात आणली. 

८४. चयापचयी क्रिया अभ्यासणारी शाखा म्हणजे 'शरीरक्रिया शास्त्र' 

८५. सस्तन प्राण्याच्या शरीरामध्ये आढळणारे हिमोग्लोबिन एक प्रथिनच असते.

८६. मानव आणि गोरिला यांच्या हिमोग्लोबिनच्या रेणूच्या संरचनेत फक्त एका अमिनो आम्लाचा फरक असतो. 

८७. मानव व न्हिसस माकड यांच्या हिमोग्लोबीन रेणूच्या संरचनेत चार अमिनो आम्ले असतात.

८८. एखाद्या सजीवाच्या भूणापासूनच्या विकासाच्या अभ्यासास 'भरौणिकी (Embroyology) असे म्हणतात. 

८९. मासा, कासव, पक्षी, डुकर, मानव यांचे भूण प्रारंभिक अवस्थेत समान अततात. 

९०.स्वसंरक्षण यंत्रणेशी निगडींत रक्त गुणधर्माचा अभ्यास करणारी विज्ञानशासखा म्हणजे रतद्रव्यशास्त्र होय. 

९१. वर्गीकरणाची अत्याधुनिक पद्धती ही डी.एन.ए. आर.एन. ए. व प्रथिने जैवरेणूच्या अभ्यासावर आधारित असते.

९२. तंतुरुपी कवकांना 'बुरशी' म्हणतात. उदा. पेनिसिलीयम, म्युकर 

९३. एकपेशीय कवकांना 'किण्द' असे म्हणतात. उदा. सॅकरोमायसिस. 

९४. ज्या संरचनेत नीलहरित जीवाणू आणि शैवाल यापैकी एक सजीव कवकावरोबर सहजीवन जगतो, त्यांना शैवाक असे म्हणतात. 

९५. उस्निया या शैवाकाचा उपयोग मसाल्यात केला जातो. (Lichens)

 ९६. जीवाणू हे सूक्ष्मदर्शकीय एकपेशीय सर्जीव आहेत. त्यांना आदिकेंद्रकी सजीव म्हणतात.

 ९७. हरिता (Mass) या वनस्पतीमध्ये संवहनी सस्थेचे कार्य करणारे संवहनी पट्ट असतात. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

State your problems.

Breaking