KRUSHISAMADHAN.COM

UPSC,MPSC,PSI,STI,तलाठी,ग्रामसेवक,लिपीक व अन्य स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त बेसिक नाॅलेज वर्ग 5 पासुन

Breaking

सातबारा मधील वर्ग 2 जमीन हस्तांतरणासाठी च्या सविस्तर तरतुदी


सात बारा मधील वर्ग 2 जमिनी बाबत हस्तांतरण कसे करावे याबाबत नेहमीच अडचण येताना दिसते तर मग आज बघू या भोगवतदार वर्ग 2 ही जमीन हस्तांतरणासाठी च्या तरतुदी बाबत "नवीन शर्तीच्या जमिनी (भोगवटदार वर्ग 2)" हा जमिनीचा धारणा प्रकार असलेल्या जमिनी बाबत परवानगी देणारी सक्षम प्राधिकरण विभागीय आयुक्त असून परवानगी देण्यासाठी कायदेशीर तरतुदी मध्ये दिनांक 8/9/1983 रोजीचा महसूल व वन विभाग क्रमांक - एल एन डी 1083/27925/सी आर 3671/ ग 6 नुसार नजराणा रक्कम कृषक प्रयोजनासाठी प्रत्येक हस्तांतरणास चालू बाजार भावाच्या 50% नजराना रक्कम आणि अकृषिक प्रयोजनासाठी प्रत्येक हस्तांतरणाचा चालू बाजारभावाच्या 75% नजराणा रक्कम व "कमाल जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरलेल्या वाटप केलेल्या जमिनी" जमिनीचा धारणा प्रकाराबाबत परवानगी देणारे सक्षम प्राधिकरण जिल्हाधिकारी असून परवानगी देण्यासाठी कायदेशीर तरतुदींमध्ये महाराष्ट्र शेत जमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 कलम 29 नुसार नजराणा रक्कम कृषिक प्रयोजनासाठी प्रत्येक हस्तांतरणास चालू बाजारभावाच्या 50% नजराणा रक्कम आणि अकृषिक प्रयोजनासाठी प्रत्येक हस्तांतरणास चालू बाजारभावाच्या 75%नजराणा रक्कम लागू राहील तसेच "भोगवटदार 2 म्हणून प्रदान केलेल्या इमारतीसाठी चे भूखंड"(सत्ता प्रकार)जमिनीचा धारणा प्रकार असलेली जमिनीबाबत परवानगी देणारे सक्षम प्राधिकरण जिल्हाधिकारी असून परवानगी देण्यासाठी कायदेशीर तरतुदी मध्ये महाराष्ट्र जमीन महसूल नियम पुस्तिका खंड 2 व शासन निर्णय महसूल व वन विभाग एलएनडी 4857/ 169145 दि.21/11/1957 नुसार नजराणा रक्कम प्रत्येक हस्तांतरणास चालू बाजारभावाच्या 50 % नजराणा रक्कम लागू राहील नंतर त्या जमिनीचा धारणा प्रकार "नवीन व अविभाज्य शर्थीने धारण केलेल्या भोगवटदार दोन जमिनी"(पाटील ,कुलकर्णी, मुलाणी,काझी, इनाम जमीन ) या धारणा प्रकारासाठी परवानगी देणारे सक्षम प्राधिकरण तहसीलदार असून परवानगी देण्यासाठी कायदेशीर तरतुदी मध्ये महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक वतन 1099/प्र क्र 233/ ल4 दिनांक -9/7/2002 यानुसार नजराणा रक्कम चालू  बाजारभावाच्या 50% नजराणा रक्कम एकदाच भरणा करणे  व जमिनीचा धारणा प्रकार "पाटबंधारे प्रकल्पग्रस्त म्हणून वाटप झालेल्या भोगवटदार 2 जमिनी वर्ग 1 करणे" या जमिनीची धारणा प्रकार असलेले परवानगी देणारे सक्षम प्राधिकरण जिल्हाधिकारी(जर जमीन वितरणास दहा वर्षे पूर्ण झाले असल्यास) व विभागीय आयुक्त(जमीन वितरणात दहा वर्षे पूर्ण झाले नसल्यास)  परवानगी देण्यासाठी कायदेशीर तरतुदी मध्ये १- महसूल व वन विभाग क्रमांक आरपीए 2004 प्रक्र 91/ र1 दि.11/06/ 2004 २- महसूल व वन विभाग क्रआरपीए 2004 प्रक्र 91/ र 1 दिनांक 24/ 12 /2004 ३-महसूल व वन  क्रआरपीए 2004 प्रक्र 91/ र 1 दिनांक 20/7/2012 नुसार नजराणा रक्कम चालू बाजार भावाच्या 50% नजराणा रक्कम एकदाच भरणा करणे त्यानंतर जमिनीचा धारणा प्रकार "नवीन व अविभाज्य शर्थीने धारण केलेल्या भोगवतदार 2 जमिनी"(महार जागले भिल्ल इनाम) याबाबत सक्षम प्राधिकरण जिल्हाधिकारी असून परवानगी देण्यासाठी कायदेशीर तरतुदी मध्ये महाराष्ट्र अधिनियम 21 /2002 दिनांक- 6/5/ 2002 आणि महसूल व वन शासन निर्णय क्र वतन/ 1099/ प्र क्र 223/ ल 4 दिनांक 9/7/2002 नुसार नजराणा रक्कम चालूू बाजार भावाच्या 50% नजराणा रक्कम एकदाच भरणा करणे त्यानंतर जमिनीचा धारणा प्रकार "मुंबई कुळवहिवाट अधिनियम 1948च्या कलम 43 नुसार च्या नियंत्रित सत्ता प्रकाराच्या जमिनी" या जमिनीच्या धारणा प्रकारांमध्ये परवानगी देणारे सक्षम प्राधिकरण तहसीलदार कुळानेेेे जमीन खरेदी करून दहा वर्षापेक्षा जास्तत काळ झाला असेल तर उपविभागीय अधिकारी कुळानेेेे जमीन खरेदी करून दहा वर्षापेक्षा कमी काळ असेल तर परवानगी देण्यासाठी कायदेशीर तरतुदी मध्ये महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक टीएनसी 04/ 2013 प्रक्र 196/ज1दिनांक 11/2/ 2014 व महाराष्ट्र कुळवहिवाट सुधारणा अधिनियम 2012 नुसार नजराणा रक्कम जमीन महसुलाच्या 40 पट रक्कम एकदाच भरणा करणे अशाप्रकारे भोगवतदार वर्ग 2 या जमिनीच्या हस्तांतरणासाठी च्या सविस्तर तरतुदी व कायदेशीर तरतुदी याबाबत आपण सविस्तरपणे माहिती घेतली आहे यामध्ये आपणाला काही शंका असेल किंवा लेखनप्रमाद  असेल तर याबाबत शासकीय संकेत स्थळावर जाऊन  शोध घेऊन आपण आपले समाधान करू शकता.

1 टिप्पणी:

  1. परिपत्रक क्र एलएनडी/१०८३/२७९२५/सीआर/३६७१/ज. ६ दि. ०८.०९.१९८३ हे परिपत्रक कोठे उपलब्ध होईल? धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

State your problems.

Breaking