पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र / यात्रास्थळ विकास योजना
• ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविकांना पायाभुत सुविधा उपलब्ध करण्यासाठी वित्तीय मर्यादा रु. २ कोटी वरुन रु. ५ कोटी.
• 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजना' 'ब वर्ग' असे योजेनेचे नामकरण.
• या योजने अंतर्गत एकुण ४९६ तिर्थक्षेत्रांना 'ब वर्ग' दर्जा.
• २०२२-२३ मध्ये ११९ व सन २०२३-२४ मध्ये १५ अशा जवळपास १३४ तीर्थक्षेत्रांना 'ब वर्ग' दर्जा प्रदान.
• २०२२ ते २०२४ मध्ये एकुण १७० 'ब वर्ग' तीर्थक्षेत्रांच्या पायाभुत सोई-सुविधा विकासासाठी प्रशासकीय मान्यता. उर्वरित तीर्थक्षेत्रांच्या
विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे प्रस्तावित.
• मोठ्या तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी वित्तीय मर्यादा रु. ५ ते २५ कोटी व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजना असे नामकरण.
• योजनेअंतर्गत एकुण २० मोठया तिर्थक्षेत्रांना मान्यता.
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र योजना 'ब वर्ग' अंतर्गत श्री संत सेवालाल महाराज, पोहरादेवी ता. मानोरा, जि. वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास कामांना रु. ३९७.७४ कोटीची प्रशासकीय मान्यता. रु. १७७.०९ कोटी निधी वितरीत.
• उमरी व पोहरादेवी ता. मानोरा, जि. वाशिम या तीर्थक्षेत्राच्या विकास कामांना रु. ३२६.२४ कोटींची प्रशासकीय मान्यता. रु.१५३.९१ कोटी निधी वितरीत.
• पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत ६ मोठ्या तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यांना उच्चाधिकार समितीची मान्यता प्रदान व मा. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीसमोर सादर करण्याची कार्यवाही सुरु.